Sharad Pawar convened a meeting of NCP ministers in mumbai
Sharad Pawar convened a meeting of NCP ministers in mumbai

शरद पवार पुन्हा सक्रीय! राज्याचा कारभार, आरक्षणावरून मंत्र्यांची झाडाझडती

पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांची भेट घेतली होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या सर्व मंत्र्यांसह केंदीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती, कोरोना स्थिती यांसह महत्वाच्या मुद्यांवर झाडाझडती घेतली. राज्यात सध्या लशींचा तुटवडा असून त्याबाबत ते सिरम इन्स्टिट्यूटच्या पूनावालांशी बोलणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. (Sharad Pawar convened a meeting of NCP ministers in mumbai)

पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची घरी जाऊन भेट घेतली. मागील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसेच कोरोना स्थितीही गंभीर बनली होती. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पूर्णपणे रद्द केले आहे. त्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण पेटलं आहे. 

यापार्श्वभूमीवर पवारांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे मंत्री, प्रमुख नेते व केंद्रीय पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच कोरोना स्थितीचा आढावा घेतला. लसीकरणातील अडचण दूर करण्यासाठी शरद पवार पूनावालांशी बोलणार आहेत. म्युकरमायकेसीस आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा कसा दूर करायचा यावरही चर्चा झाली. 

केंद्र सरकार बँकिंग कायद्यामध्ये बदल करत आहे. आरबीआय ला अधिकार देऊन सहकारी बँक संपण्याचा डाव आहे. याचा आढावाही शरद पवार यांनी घेतला. राज्य सरकारने याबाबत टास्क फोर्स निर्माण करून त्यात तिन्ही पक्षाचे मंत्री, सहकार क्षेत्र, बँकेतील तज्ञ घेण्यात येतील. या सुधारणा कशा थांबवता येतील यावर त्यात पर्याय शोधले जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना 27%  आरक्षण देण्यात आलं होतं. राजकीय आरक्षण संपले, असे चित्र निर्माण झाले आहे. पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. ओबीसी आरक्षण शिक्षण,नोकरी,राजकीय ते अबाधित राहीले पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही कायदा केला. भाजप सरकार असताना कायदा मंजूर झाला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अडचणी निर्माण झाल्या आहेत. आम्ही मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका असून इतर पर्यायांबाबत सकारात्मक आहोत. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका पवारसाहेबांनी मांडल्याचे मलिक यांनी सांगितले. 

वर्धापनदिनी फेसबूकवरून कार्यकर्त्यांशी संवाद 

राष्ट्रवादी काँग्रेसचा 10 जून रोजी वर्धापनदिन आहे. कोरोनाचे नियम पाळत नेते आपल्या पक्ष कार्यालयात झेंडा वंदन करतील. 
झेंडावंदन झाल्यावर शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार फेसबुक माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती मलिक यांनी दिली. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com