शरद पवारांना सचिनला सल्ला देण्याचा अधिकार आहेच! - Sharad pawar can adivise sachin. Chhagan Bhujbal Politics | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांना सचिनला सल्ला देण्याचा अधिकार आहेच!

संपत देवगिरे
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या शेतकरी आंदोलनाशी संबंधीत ट्वीटचा वाद शमेल असे दिसत नाही. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सचिनला सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या शेतकरी आंदोलनाशी संबंधीत ट्वीटचा वाद शमेल असे दिसत नाही. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सचिनला सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

सचिन तेंडूलकर यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले होते. त्यावर विविध प्रतिक्रीया उमटल्या होत्या. त्या संदर्भात ज्येष्ठ नेते आणि क्रिकेट महासंघाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांन सचिनने क्रिकेट सोडून अन्य विषयावर जपुन बोलावे असे मत व्यक्त केले होते. त्यावर काहींनी टिका केली होती. त्यासंदर्भात भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली. 

भुजबळ म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे. क्रिकेट, कबबडी, कुस्तीच्या विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अनेक क्रिकेटपटूंना श्री पवार यांच्यामुळे मानधन सुरू झाले. क्रिकेट संघटनेच्या विविध पदावर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना क्रिकेटपटू सचीन तेंडूलकर यांना क्रिकेट सोडून इतर विषयावर जपून बोलावे हे सांगण्याचा निश्चितच अधिकार आहे. त्यात गैर वाटण्यासारखे काही नाही.

नाशिकच्या नियोजन आराखड्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी या आराखड्यातील मागणीनुसार वाढीव 150 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली. आता नाशिक जिल्ह्याचा नियोजन आराखडा 950 कोटींचा झाला आहे. या बैठकीत नाशिकला होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिका नगरसेवकांचे योगदान असावे. महापालिकेने सर्वसाधारण सभा घेऊन त्यातून निधी द्यावा, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख