संजय राऊत, आशिष शेलार भेट; भाजपच्या मनात नक्की काय चालय?   - Secret meeting between Shiv Sena MP Sanjay Raut and BJP leader Ashish Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

संजय राऊत, आशिष शेलार भेट; भाजपच्या मनात नक्की काय चालय?  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर राजकिय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास बैठक झाल्याचे समजते. (Secret meeting between Shiv Sena MP Sanjay Raut and BJP leader Ashish Shelar)

ही बैठक नेमकी कशामुळे झाली? संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली. ही भेट कशासाठी होती. या गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत. या नेत्यांच्या बैठकीतील तपशील समजू शकला नसला तरी त्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना दिसल्या आहेत. 

...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला

या नेत्यांच्या भेटीवर भाष्य करताना भापज नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की ''भाजप- शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असे शिवसेनेला वाटले तर ते येतील. तेव्हा भाजप नक्कीच विचार करेल, असे मुनगंटीवार यांनी म्हटेल आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. मात्र, भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

भापजची खेळी फेल करण्यासाठी ठाकरे सरकारचा हा प्लॅन

शेलार आणि राऊत यांच्यात भेट झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणले, काही दिवसांपासून भेटीगाठी सुरू आहेत. पण या भेटीत एक नेतृत्व कायम आहे. ते म्हणजे संजय राऊत. पण राऊत आणि शेलार यांनी भेटीचे खंडन केले आहे. भेट झाली नसेल तर त्यावर तर्कवितर्क करणे चुकीचे आहे.'' असे सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख