sanjay raut with udhhav thackrey first promo released | Sarkarnama

तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत का?; संजय राऊतांचा ठाकरेंना पहिला प्रश्न!

गणेश कोरे
बुधवार, 22 जुलै 2020

मंत्रालयात कमीत कमी गेलात यावर आपल्यावर टीका झाली...तुम्हाला कोरोना वर डॉक्टरेट मिळावी...तुम्ही काही तरी लपवताय का?

पुणे :  'सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखती नंतर 'संजय राऊत विथ उद्धव ठाकरे या "काय म्हणतय ठाकरे सरकार"… या अनकट मुलाखतीत राऊत यांनी ठाकरे यांना पहिलाच प्रश्न 'तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेत का? हा विचारला आहे. 

25 आणि 26 जुलैला प्रसिद्ध होणाऱ्या बहुचर्चीत मुलाखतीचा प्रोमो आज प्रकाशित करण्यात आला. या मुलाखतीत संजय राऊत यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना विविध प्रश्न विचारत मुलाखतीची उत्कंठा वाढविली आहे. 

विविध प्रश्नांमध्ये राऊत यांनी पहिलाच प्रश्न आपल्या डोक्यावरील केस कमी झालेत हा गेल्या सहा महिन्यातील परिणाम आहे का? असं विचारत वातावरण हलके फुलके करत ठाकरे यांना मनमोकळं करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी देखील या प्रश्नाला हसुन दाद देत वातावरण हलके केले. विविध प्रश्नांमध्ये आपण सहा महिन्यांकडे कसे पाहता...कोरोना संकटात महाराष्ट्रात सैन्याला पाचारण कराव अस वाटल कां...मंत्रालयात कमीत कमी गेलात यावर आपल्यावर टीका झाली...तुम्हाला कोरोना वर डॉक्टरेट मिळावी...तुम्ही काही तरी लपवताय का?… मुंबईत वडापाव कधी मिळणार...आदि प्रश्न विचारले. 

यातील मंत्रालयात फारच कमी गेल्याबाबत टीका होते या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, नियमांचे पालन मी जर नाही केले तर जनता कशी करणार, असे उत्तर दिले. तर परिक्षांबाबत ठाकरे म्हणाले, माझ हि म्हणणं आहे परिक्षा व्हाव्यात पण....याबाबत उत्कंठा वाढविली आहे. तर कोरोना बरोबर तुम्ही जगायला शिकलेला आहात यावर ठाकरे म्हणाले, " शहाणं व्हायच का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शहाणं होण्याचा आपण तरी प्रयत्न करतोय, असे उत्तर दिले आहे. मुलाखतीच्या पहिल्या प्रोमो नंतर दुसऱ्या प्रोमोची उत्कंठा राजकीय क्षेत्रात वाढली आहे.

१०० पदांच्या बिंदूनामावली पटोले आग्रही 

मुंबई : राज्यात सुरु असलेली उच्च शैक्षणिक सस्थांमधील भरती प्रक्रिया १०० पदांच्या बिंदूनामावलीच्या केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच राबविली जावी. इतर मागास प्रवर्गांसह अन्य मागास प्रवर्गांवर गेल्या 25 वर्षांपासून होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी भरती आणि पदोन्नतीबाबतच्या धोरणाचा सूत्रबध्द प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करुन संविधानाने दिलेल्या अधिकारांची जपणूक केली जावी असे निर्देश श्री. पटोले यांनी आज दिले. 

महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीकरीता असलेल्या १०० बिंदूनामावलीत इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर करण्यासंदर्भात श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री, श्री. विजय वडेट्टीवार उपस्थित होते. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख