अदर पूनावाला यांना महाराष्ट्रातून धमकी नाही; संजय राऊतांचा इशारा कोणाकडे - Sanjay Raut spoke about the violence in West Bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

अदर पूनावाला यांना महाराष्ट्रातून धमकी नाही; संजय राऊतांचा इशारा कोणाकडे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

बंगालमध्ये हिंसा होणे ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे हे पाहावे लागेल.

मुंबई : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (adar Poonawala) यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या विषयी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, ''महाराष्ट्रातून कोणी धमकी देणार नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. उलट महाराष्ट्रात लस तयार होत आहे. याचा आम्हाला अभिमानच असल्याचे सांगतानाच पूनावाला यांचे वक्तव्य गंभीर आहे. त्यांना कुणी धमकी दिली असेल तर त्याची चौकशी होईल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. 

हे ही वाचा : आता मृतदेहांच्या दागिन्यांचीही होतेय चोरी; कोरोना सेंटरमधील धक्कादायक प्रकार

राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ''निवडणूक निकाला नंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) निवडणूकांचा इतिहास हा नेहमीच रक्तरंजित राहिलाय. निकालनंतर हिंसा होणे हे तिथे काही नवीव नाही. मात्र, आज देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा अश्या गोष्टी टाळायला हव्यात, बंगालमध्ये हिंसा होणे ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या'', असेही राऊत म्हणाले. Sanjay Raut spoke about the violence in West Bengal
 
पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली. मात्र, निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे. एकमेकांना धमक्या देणे थांबवले पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. 2024 ची लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र मिळवून लढवू. राहिला नेतृत्वाचा प्रश्न तर दिल्लीत बसून कोण नेतृत्व करेल हे पाहावे लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : आता 'महाविकास'चा करेक्ट 'कार्यक्रम होणार' का? 

आशिष शेलार (Ashish Shelar) काय म्हणाले होते...

अदर पूनावाला यांना नुकतीच केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह बड्या व्यक्तींकडून धमक्या येत असल्याचा गौप्यस्फोट पूनावाला यांनी केला होता. कोरोनाच्या संकटात आज आम्हाला राजकारण करायचे नाही. लोकांची सेवा करणे भाजपचे धोरण आहे. असेही ते म्हणाले. 

''या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्या पक्षाला उघडे करण्याचे काम परिस्थिती निवळल्यानंतर भाजप करणार आहे. माझ्याकडे आणि पक्षाकडे याची माहिती आहे. त्यावर आज भाष्य करणार नाही. ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार राहावे, आमच्याकडे माहिती येत आहे'', असा इशारा यावेळी शेलार यांनी दिला होता. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख