संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेना विकली... - Sanjay Raut sells Shiv Sena to Congress-NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेना विकली...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.  त्यातच लाड यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

मुंबई : हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका भापचे नेते प्रसाद लाड यांनी केली.   

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी त्यांनी  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 

जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील असंही लाड यांनी सांगितले. 

दरम्यान, लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.  त्यातच लाड यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

लाड व ठाकरे यांच्यामध्ये जवळपास पाऊन तास चर्चा झाली. कृष्णकुंजवरुन बाहेर येताच लाड यांनी भाजपचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी प्रतिक्रिया दिली. ठाकरे यांच्यासोबतची ही  भेट वैयक्तीक होती, असे लाड म्हणाले होते. 

भाजपची सत्ता आणण्यासाठी जे जे शक्य आहे, ते करू. युतीबाबत प्रश्नावर योग्य वेळ आल्यावर बोलूच, राज ठाकरे यांना लागण्याने मी पाहायला आलो असल्याचे लाड म्हणाले. भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेतणार असल्याचे सांगत लाड यांनी मनसेबाबत सूचक वक्तव्य केल होत. येत्या 2-3 दिवसात काही गौप्यस्फोट होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई महापालिका भाजप ताकदीनं लढणार

मुंबई महापालिका निवडणूक भाजप ताकदीन लढणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व नेते खिंड लढवतील. यावेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला आहे. 

‘धनंजय मुंडेंबाबत जे घडलं ते चुकीचं’

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, आता तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचं आहे. अशा प्रवृत्तींना चाप बसायला हवी. संबंधित महिलेची चौकशी झाली पाहिजे आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही लाड यांनी केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांना इशारा 

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन प्रसाद लाड यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी इशारा दिला आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलाबाबतचं विधान ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी करायला हवं होतं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे काँग्रेसचं काम आहे. काँग्रेसची ही भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल थांबवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, एमसईबीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशाराच लाड यांनी नितीन राऊतांना दिला आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख