पवार-शहा भेटीवर संजय राऊत म्हणतात हाती काहीच लागणार नाही 

पवार-शहा भेटीवरुन तर्कवितर्काच्या धुळवडीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरसंधान साधले आहे.
 Amit Shah, Sharad Pawar .jpg
Amit Shah, Sharad Pawar .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्काच्या धुळवडीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शरसंधान साधले आहे. पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत ट्वीट करत म्हटले आहे की ''मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही''. असे राऊत म्हणाले आहेत. 

राऊत यांनी काही वेळापुर्वी म्हटले होते की शरद पवार आणि शहांची भेट झाली असेल तर होऊ दे. बंद खोलीतील मुद्दे बाहेर येतात. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली, असेल तर होऊ द्या. या भेटीत सस्पेन्स असे काय आहे. दोन नेत्यांनी भेटणे त्यामध्ये वावगे काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचे काही काम असू शकते. मात्र, त्यांनी काही वेळातच ट्वीट करत ही भेट अजीबात झालेली नाही, असे सांगितले. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते? 

शरद पवार आणि अमित शाह भेटीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ असल्याचे पाटील म्हणाले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले की ''पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होते. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है''. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com