संजय राऊत म्हणतात, "शरद पवार राजकारणातील तालेवार नेते !' 

केंद्रातील सीबीआय, ईडी सारख्या तपास करणाऱ्या संस्था काहीवेळा गैरवापर करतात.
संजय राऊत म्हणतात, "शरद पवार राजकारणातील तालेवार नेते !' 

पुणे : शिवसेनेचा दसरा मेळावा हा आऊटडोअरच होणार आहे. सर्व अटी आणि शर्थीचे पालन करून मेळावा साजरा केला जाणार आहे असे स्पष्ट करतानाच ठाकरे सरकारने सीबीआयबाबत घेतलेला निर्णय योग्यच आहे असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

केंद्रातील सीबीआय, ईडी सारख्या तपास करणाऱ्या संस्था काहीवेळा गैरवापर करतात. विशेषत: ज्या राज्यात विरोधीपक्षाचे सरकार असते तेथील सरकारविरोधात या संस्था काम करतात. त्यांना त्रास देतात, बदनाम करतात. त्यामुळे सीबीआयला जर एखाद्या घटनेबाबत तपास करायचा असेल तर राज्याची त्यांना परवानगी घ्यावी लागेल ही चांगलीच बाब आहे. यापूर्वी पश्‍चिम बंगाल सरकारनेही सीबीआयला राज्यात पाय ठेवू दिला नव्हता याकडे राऊत यांनी लक्ष वेधले आहे. 

राज्यातील घडामोडींबाबत पत्रकारांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, की खडसेसाहेबांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. त्या पक्षाची त्यांची राजकीय भूमिका असू शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील तालेवार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी खडसेंना पक्षात घेताना योग्य तो निर्णय घेतला असेल. 

अडचणीच्या काळात ज्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे नाही अशी भूमिकाही श्री. पवार यांनी घेतली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.खडसे यांना राष्ट्रवादीत घेतल्याने त्यांची काही तरी राजकीय भूमिका असू शकते.खडसे यांनी भाजपचा दिलेला राजीनामा त्यानंतरच्या दिवसभरातील घडामोडी मी पाहत होतो असेही राऊत यांनी सांगितले. 

हे ही वाचा : 
'एखादा तरुण नेतृत्व करीत असेल तर अडचण काय?'  

सांगली : "पक्षात एखादा तरुण (विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस) मोठा होत असेल, नेतृत्व करीत असेल तर अडचण काय? नेतृत्व कुणीतरी एकटाच करू शकतो, सर्वांना थोडीच प्रमुख करणे शक्‍य आहे,'' असे म्हणत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांची बाजू घेत एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर टीका केली. 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com