संजय राऊत म्हणतात... फडणवीसांना यासाठी माझ्या शुभेच्छा  - Sanjay Raut says My best wishes to Fadnavis for this | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणतात... फडणवीसांना यासाठी माझ्या शुभेच्छा 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.

मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'लवकरच फासे पलटतील' या विधानाने राजकीय वर्तूळात चर्चा रंगली. फडणवीसांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केल.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात लवकरच फासे पलटतील असे भाष्य केल होत. या विषयी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना 'यासाठी माझ्या शुभेच्छा अस एका वाक्यात त्यांनी प्रत्युत्तर दिले'. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल राऊत यांनी पटोले यांचे अभिनंदन केल. नानांवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केलेली नाही, तर त्यांच कौतुकच केल आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस हा देशातील महत्वाचा पक्ष आहे. तो सत्तेत नसला तरी या पक्षाची परंपरा आणि इतिहास मोठा आहे. राज्यातच नव्हे, तर देशात काँग्रेसला संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा आहे. पक्षात परिवर्तन करावं हा त्याचा अंतर्गत प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. 

काँग्रेसला पाच वर्षासाठी पद दिले होते. शदर पवार म्हणाले त्या पद्धतीने तीनही पक्ष निर्णय घेतील. अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. त्यासाठी पुन्हा निवडणुका घेणे योग्य नाही. शेतकऱ्यांनी केलेल्या चक्का जामला आमचा पाठिंबा असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटले आहे. 

नाना पटोले यांची अखेर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यासोबत महाराष्ट्रासाठी ‘टीम काँग्रेस’ची जम्बो कार्यकारिणीही जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीत 5-6 कार्याध्यक्ष, पंधराएक उपाध्यक्ष असा जंगी पसारा दिसत आहे. म्हणजे नाना हे प्रांतिकचे अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल.

मुंबईतही भाई जगताप अध्यक्ष व दुसरे एक चरणजितसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून नेमले आहेतच. काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची ही नवी पद्धत स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्याच वेळी काँग्रेस पक्षातील या संघटनात्मक घडामोडींचा अंदाज व्यक्त झाला होता. नाना पटोले यांनी आता सांगितले आहे की, पक्षाच्या आदेशानुसार आपण काम करू. पटोले यांनी राजीनामा का दिला व पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी का सोपविली हे काही आता लपून राहिलेले नाही. पटोले यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे.

काँग्रेस पक्षात हे फेरबदल अपेक्षित होतेच. त्यांचा तो अंतर्गत मामला आहे. अर्थात बाळासाहेब थोरात जाऊन पटोले येत आहेत एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँगेस पक्षाची अवस्था अशी झाली होती की, राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशा वेळी बाळासाहेब थोरातांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले व अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळविले. 

नाना हे शेतकरी, कष्टकऱयांचे नेते आहेत व त्यांचा पिंड हा घटनात्मक चौकटीच्या पिंजऱयात बसून काम करणाऱयांचा नाही. 
नाना पटोले यांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेताना आता विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल याचाही विचार काँग्रेसच्या हायकमांडने केलाच असेल. विधानसभा अध्यक्षपदासाठी आता पुन्हा निवडणूक घ्यावीच लागेल व पुन्हा एकदा आकडय़ांची जुळवाजुळव नव्याने करावी लागेल.

बहुमताचा आकडा नक्कीच आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही आघाडी सरकारात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुनः पुन्हा निवडणुका टाळणे सगळय़ांच्याच हिताचे ठरत असते. विरोधकांनी बेडकी कितीही फुगवली तरी त्यांचा बैल होणार नाही हे खरेच, पण तरीही त्यांना हाकारे, उकारे, आरोळय़ा ठोकण्याची संधी का द्यावी?   

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख