केंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा!  

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे.
 Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

मुंबई : जगभरात ज्या वेळी पूर किंवा दरडी कोसळण्याचा घटना घटतात. त्यावेळी बचावकाऱ्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे. पण महाराष्ट्र मध्ये सुद्धा जर अशा काही घटना घडतात तेव्हा शक्‍यतो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे, तिथे जाऊन अधिकाऱ्यांवर आरोप करणे हल्ले करणे हे थांबले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) लगावला आहे. (Sanjay Raut said that Union ministers should bring a check of Rs 2,000 crore) 

ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की ''महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपला आहे, सातारा, सांगली तील माणसे आपली आहे. प्रत्येकाला असे वाटते की आपण मदत करावी, आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत,'' असेही ते म्हणाले.  

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिलेले आहेत, पण केंद्राची जबाबदारी आहे, महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देते. विशेषतः मुंबई, आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही पण केंद्र आमचा बाप आहे, महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे, त्यांनी काही घोषणा केलेली आहेत. त्यांनी येताना दोन हजार कोटीचा चेक घेऊन यावा केंद्राकडून, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सही असलेला चेक घेऊन यावा एखादा, जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण व सातारा, सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू, असे राऊत म्हणले. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची राष्ट्राला गरज
  
यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचे यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असे प्रत्येकाला वाटते. त्याचे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. उद्धव ठाकरे यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची  राष्ट्राला गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असे राऊत म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye   

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com