राऊत म्हणतात...मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे संकेत तेच 

राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत
 Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये विरोधी पक्षांचा भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. कुणी तरी आहे तिथे. त्यांना आमच्याकडे यायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ तसाच आहे. असे राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut said on Uddhav Thackerays statement)

राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कुणी तरी तिथे आहे, त्यांना आमच्याकडे यायचे आहे, असे सांगत राऊत यांनी धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपमधील कोण नेते महाविकास आघाडीत येणार या विषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाषण केले. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्येच ते बोलले. नवीन गठबंधन होईल आणि सरकार पडेल आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचे आहे, जे आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून विधान केले, असे राऊत म्हणाले. 

राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत, विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितले त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छित आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले 72 तास थांबा म्हणून. तर काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. पतंगवर जाते आणि कापली जाते, असा टोला राऊत यांनी पाटलांना लगावला आहे.  

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना कमिटमेंट पाळणारी आहे. आम्ही पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही शिवसेनेची ही खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची, असे राऊत म्हणाले. हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल तर त्यांनी तो उडवत बसवावे. पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, असे राऊत म्हणाले. 

भाजपच्या काही लोकांनी शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा केली. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची धमकी दिली, अशा विचारधारेचा पक्ष आहे. हे त्यांचे कल्चर आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार, असा सवाल राऊत यांनी केला. आम्ही युती तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचे चांगले आलले आहे. राज्य उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथेच संपले, असेही राऊत यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com