...तर मी फडणवीसांच्याही घरी जाईन 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काला भेट झाली.
 Sanjay Raut, Devendra Fadnavis .jpg
Sanjay Raut, Devendra Fadnavis .jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील एका विधानाने शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षातील नेते, लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. यातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काला भेट झाली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. (Sanjay Raut said about Devendra Fadnavis)  

संजय राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना सत्तार आणि दानवे यांच्या भेटीविषयी विचारले त्यावर राऊत म्हणाले, रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार एकत्र बसल्याने अडचण वाटण्याचे काही कारण नाही. ते त्या भागातील मंत्री आहेत. दानवे आणि आम्हीही एकत्र बसतो. राजकारणात कडवटपणा नसतो. उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटले तर त्यांच्याशी मी नक्कीच बोलेन. त्यांची ख्याली खुशाली विचारेन. उद्या मला त्यांच्या घरी जावसे वाटले तर मी त्यांच्याकडेही जाईन, असे राऊत म्हणाले. एकमेकांचे तोंड पाहायचे नाही, एकमेकांशी बोलायचेदेखील नाही, असे महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे महाराष्ट्रात चालत नाही. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असेही यावेळी राऊत म्हणाले.     

दरम्यान, सत्तार थेट दानवेंच्या औरंगाबादेतील बंगल्यात गेले. तिथे या दोघांनीही प्रसार माध्यमांचे चांगलेच मनोरंजन केले. युतीसाठी मला मध्यस्ती करायला सांगितले तर मी नक्की करीन, असेही सत्तार यांनी सांगून टाकले. यावेळी दोघांनी काही जुन्या गोष्टी पुन्हा उगाळून सांगितल्या. यात सत्तार यांच्या डोक्यावरील टोपी, दानवेंनी विधानसभेला मला दगा दिला वगैरे वगैरे. काही दिवसांपुर्वीच अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे राजकारण घातक असल्याची टीका केली होती. 

लोकसभा निवडणूक आली की ते पाया पडतात, निवडणूक झाली की लाथा मारतात असा आरोप त्यांनी केला होता. तर शिवसेनेच्या संपर्क मोहिमेत सत्तार यांनी गाव तिथे शिवसेना शाखा उभारण्याचा सपाटा लावला तेव्हा, या शिवसेनेच्या शाखा नाही, तर सत्तार यांच्या शाखा असल्याचे दानवे यांनी म्हटले होते. तर हे असे दोघांचे अधून मधून सुरूच असते. याची आता दोघांच्याही समर्थकांना सवय झाली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com