मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही!

पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे.
 Sanjay Raut .jpg
Sanjay Raut .jpg

बेळगाव : बेळगाव महापालिका (Belagavi Municipal Corporation) निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, भाजपच्या विजयानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Raut reaction on Belagavi municipal election) 

राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून राज्यात काही लोक पेढे वाटत आहेत. "मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही," असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर येत्या काही दिवसात बेळगावचा दौरा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.  

मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. मात्र, यामागे मोठ कारस्थान झाले असेल याची कल्पना करवत नाही. ईव्हीएमवर याचे खापर फोडणार नाही. मात्र, कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणण्यासाठी, बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये, यासाठी काय गडबड केली. त्याची माहिती बाहेर येईल, असेही राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपने या निवडणुकीत अतिशय आक्रमकरित्या प्रचार केला होता. आता पर्यंत भाजपचे ३६ उमेदवार विजयी झाली आहेत. काँग्रेस 8 तर, अपक्ष 7 उमेदवार विजयी झाले आहेत. एआयएमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीला ३ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. 

पहिल्यांदाच पक्षपातळीवर लढल्या गेलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सुरु आहे. येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्च केला आहे.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com