उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल? - Sanjay Raut criticizes BJP over growing corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

 उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल?

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 एप्रिल 2021

पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे.

मुंबई : राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा असलेला विरोध हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेमुळे आहे. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. 

राऊत रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. मात्र, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा फडणवीस काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असे फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना

यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना देशातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याची टीका केली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते. निवडणुका आहेत म्हणून माणसे मारता येणार नाही. राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. बंगालमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. त्याठिकाणी कोरोना नाही, असे नाही. थोड्याच दिवसांत तेथील भयावह परिस्थिती समोर येईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

लशीचे राजकारण : सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात अन् सर्वांत जास्त लशी भाजपच्या राज्यांना
 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असे राऊत म्हणाले. जास्तीत जास्त लसी आणि रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध करुन देणे, ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जौशी हे कोरोना ग्रस्त आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षातल्या लोकांना कोरोना होणार नाही हे विरोधकांनी डोक्यातून काढून टाकावे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख