सरकार पाडतील तेव्हा फडणवीस यांचे अभिनंदन करुन; संजय राऊत   - Sanjay Raut criticized Leader of the Opposition Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार पाडतील तेव्हा फडणवीस यांचे अभिनंदन करुन; संजय राऊत  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

विठोबा माऊलीचा आशीर्वाद सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर सरकार आलेच नसते.

मुंबई : तुम्ही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. उर्वरित करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता करू नका,'' असे वक्तव्य केल्याने राज्यात पुन्हा यानिमित्ताने सत्ताबदलाची चर्चा सुरू झाली आहे.  त्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करु, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत हे एक वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळे ते म्हणाले, फडणवीस यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याने प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल. विठोबा माऊलीचा आशीर्वाद सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर सरकार आलेच नसते. त्यांनी जर विठोबा माऊलीला साकडे घातले असेल तर विठोबा माऊली पाहील ना. मात्र, जनता कोरोना संकटात सापडली असतांना या काळात सरकार पाडणे, सरकार घालवणे, सरकार अस्थिर करणे या सगळ्यातून बाहेर आले पाहिजे'' असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतही 'स्वच्छता मोहीम'

विरोधी पक्षनेते प्रचारासाठी गेलेत. त्यांनी प्रचार करावा. जनता जो काही निर्णय घ्यायचाय तो घेईल. मात्र, एक सांगतो विरोधी पक्षाला अशाप्रकारची भाषणे करावी लागतात. फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी आणि त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणे करावी लागतात. अशी भाषणे आम्ही केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केली आहेत. राजकारणात अशा भाषणांना जेवढे महत्त्व द्यायचे ते तेवढंच द्यायचे. ते सरकार जेव्हा पाडतील तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करु'', असा टोला राऊत यांनी लगावला. 

''सरकारचे काऊंटडाऊन म्हणता येणार नाही. हा शब्द चुकीचा आहे. राजकारणात मंत्र्यांचे राजीनामे, सरकारवर आरोप-प्रत्यारोप होणे हे नवीन नाही. फडणवीस सरकार होते तेव्हासुद्धा अशाप्रकारचे आरोप, मंत्र्यांचे राजीनाम्याच्या घटना घडल्या होत्या. काही मंत्र्यांनी राजीनामे घेणे गरजेचे असतानाही राजीनामा घेण्यात आला नव्हता. या राजकारणाच्या चालिरिती किंवा परंपरा आहेत. सरकारला धोका आहे, असे मला वाटत नाही'',  अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

संजय राऊत बेळगावात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राऊत 14 एप्रिलला बेळगावला जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार आहे. याबाबत राऊत म्हणाले, मी बेळगावात जाणार. ''महाराष्ट्र एककीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारातील सर्व कार्यक्रमात सहभागी होणार'', असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थांच्या आरोग्याला धोका असल्याने मेडिकलच्या सर्व परिक्षा पुढे ढकला...
 

''बेळगावशी आणि महाराष्ट्र एककीकरण समितीसोबत आमचे भावनिक नाते आहे. आज त्यांना आपली गरज आहे. इथे बसून नुसते फुसके बार सोडून चालणार नाही. तिथे मैदानावर उतरुन मदत करायला हवी. माझी विरोधी पक्षाच्या किंवा सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, आपल्याला त्यांच्यासाठी निदान एकदिवस तरी प्रचारासाठी दिले पाहिजे. मला त्यांनी आमंत्रण दिले, मी त्यांना शंभर टक्के येणार, असे सांगितलंय. महाराष्ट्र एकीकरण समितीतच तिथे शिवसेना आहे'', असे राऊत म्हणाले.

''आम्ही बेळगावात आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार आहोत. तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा उद्भवू शकतो? राज्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा कर्नाटकचे मंत्री प्रचाराला येतात. तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा उल्लेख होत नाही? कर्नाटकाच्या नेत्यांना कोणी आडवले का, मग आम्हाला का आडवता? ते काय करतील? गोळ्या चालवतील किंवा लाठ्या चालवतील. बेळगावात भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांना आडवले तर मी प्रचार करेल'', असेही राऊत यांनी सांगितले.

पश्चिम बंगाल निवडणुकी विषयी बोलतांना राऊत म्हणाले, की बेळगाव येथून आल्या नंतर पश्चिम बंगालला प्रचाराला जाण्याविषयी विचार करणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. कोणत्याही निवडणुकीत हिंसाचार होता कामा नये. असे राऊत म्हणाले.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख