''घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है''  - Sanjay Raut criticism of Amit Shah | Politics Marathi News - Sarkarnama

''घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है'' 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राऊत यांनी एक शेअर ट्विट करत अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.  “तुफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है, और घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है'' असे ते म्हणाले. 

मुंबई : आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्ग येथे केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ''घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है'', म्हणत शहा यांच्यावर निशाणा साधला. 

राऊत यांनी एक शेअर ट्विट करत अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.  “तुफान ज्यादा हो तो, कश्तियाँ डूब जाती है, और घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है'' असे ते म्हणाले. 

शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यावर अमित शहा यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर ७ फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शाह यांनी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, असे वक्तव्य केले होते. 

शहा यांनी शिवसेनेवर टीका केल्या नंतर राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला, ते म्हणाले, १९७५ मध्ये काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर ११९० मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली, असे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर आज पु्न्हा ट्विट करत गर्व असणाऱ्या कित्येक व्यक्तींचं अस्तित्व संपलेलं आहे, असे म्हणत शहा यांना टोला लगावला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख