मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न : चौकशीतून सत्य बाहेर आणाच  - Sanjay Rathore spoke after his resignation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न : चौकशीतून सत्य बाहेर आणाच 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला.

मुंबई : ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणावरुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात विरोधी पक्षाने अत्यंत घाणेरडे राजकारण करत माझ्याबरोबर समाजाचीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय, सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे. प्रकरणातील सगळे सत्य बाहेर यावे, अशी माझीही इच्छा आहे'', अशी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. 

महात्मा गांधी जिवंत असते तर गोडसेलाही माफ केलं असतं!
 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

दरम्यान, संजय राठोड दुपारी 2. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी गेले होते. या वेळी राठोड आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. 

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव नाही, ते निर्णय घ्यायला समर्थ आहेत. 
 

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली होती. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. १ मार्च) सुरु होत असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही होता. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले होते, असे सांगण्यात येत होते. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख