संजय राठोडांचा पत्ता पोलिसांना द्यावा...

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे. या प्रकरणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे.
 Chitra Wagh, Director General of Police Hemant Nagarale .jpg
Chitra Wagh, Director General of Police Hemant Nagarale .jpg

मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे. या प्रकरणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, तो अहवाल या प्रकरणात नाव असलेले मंत्री संजय राठोड यांची विचारणा केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही? असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भामध्ये त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राठोड यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. राज्यातले मंत्री जर संजय राठोड यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी पोलिसांना त्यांचा पत्ता द्यावा, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले.

यावेळी त्यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र दिले. त्या प्रत्रात वाघ म्हणाल्या की, ''पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गुढ आद्याप कायम आहे. तीने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रर नाही असे स्टेटमेंट दिले आहे''. 

''त्याच दरम्यान प्रसिद्धीमाध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी शांताबाई राठोड पूजाने आत्महत्या केली नाही. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तीच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली असल्याचे वाघ म्हणाल्या आहेत.'' 

दरम्यान, पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉटरिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी (ता.२३ फेब्रुवारी) पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.  मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने वाशिम जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

त्यामुळे मंत्री राठोड खरोखच या ठिकाणी येणार की नाही? संचारबंदी असल्याने पोलिसांना इतरही कामे वाढली आहेत. त्यातून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. यामुळे हा लॉकडाऊन वनमंत्री राठोड यांच्या पथ्यावर तर पडला नाही ना? अशी चर्चा राज्यात सुरु आहे.  

संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु असल्याने, पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आम्ही आज तीन वाजता चर्चा करून बंजारा समाजाला आवाहन करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

पोहरादेवी येथे उद्या वनमंत्री संजय राठोड येणार असल्याचा अधिकृत दौरा आमच्याकडे आला नाही. मात्र, कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत आहेत. त्यामुळे आम्ही पोहरादेवी येथील महंतांना नोटीस बजावली असून, येथील महंतांसोबत आमची चर्चा सुरू, असल्याची माहिती वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. 

दरम्यान, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, महाराज कर्नाटकमध्ये असून, उद्या हजर राहणार आहेत. अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com