मनसेला लागलेल्या गळतीवर संजय मोनेंची भावनिक पोस्ट  - Sanjay Mone emotional post on MNS  | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेला लागलेल्या गळतीवर संजय मोनेंची भावनिक पोस्ट 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुस-या पक्षात प्रवेश केला की लगेच "मोठी बातमी" असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते याचा अर्थ त्या पक्षाच्या "असण्याची" सगळे जण दखल घेतात..हो ना?

मुंबई : कल्याण डोबिंवलीमध्ये मनसेला गळती लागली आहे.  मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. तर, आज डोंबिवलीत मनसेचा दुसरा महत्त्वाचा चेहरा असलेले मंदार हळबे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावर मराठी अभिनेते संजय मोने यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

मोने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ''ज्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे, त्या पक्षाच्या कुठल्याही पातळीवरच्या नेत्याने दुस-या पक्षात प्रवेश केला की लगेच "मोठी बातमी" असा मथळा देऊन बातमी लिहिली किंवा बोलली जाते याचा अर्थ त्या पक्षाच्या "असण्याची" सगळे जण दखल घेतात..हो ना? असे मोने म्हणाले.

याचा अर्थ सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घ्यायला हवा. या मधल्या लाॅकडाऊनच्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत (साहाय्य खरं तर) केली , ते जरा लक्षात ठेवा. माझ्या मतदार संघात ,जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे, नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते. तर, थोडा शब्दप्रयोग बदलतो, तर. आपला हक्क आहे असं समजा, असे मोने म्हणाले आहेत. 

तळटीप-मी कुठल्याही पक्षाची बाजू घेत नाहीये. फक्त परिस्थिती आणि अवस्था काय होती ते सांगतोय. इतर अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आणि अवस्था होती. शेवटी आपण ठरवायचं आहे. जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो ) यात निवड करायची आहे. बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका. रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं'', असल्याचे मोने यांनी सांगितले. 

दरम्याण, कल्याण डोंबिवलीमधील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवार (ता. १ फेब्रुवारी) रोजी मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज डोंबिवलीत मनसेचा दुसरा महत्त्वाचा चेहरा असलेले मंदार हळबे पक्ष सोडून गेले. यामुळे महानगरपालिकेमध्ये मनसेला मोठं भगदाड पडल आहे. याच अस्वस्थतेतून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. 

दरम्याण, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेतील इनकमिंग वाढतच आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सोमवार (ता. १ फेब्रुवारी) रोजी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रवेशाला महत्व दिले. कोणत्याही पदावर नसलेल्या मनसैनिकांना त्यांनी स्वतः गंडाबंधन केले. डोंबिवलीत शिवसेनेचे ताकद आहे पण तरीही तरुण रक्ताला वाव दिला जाईल, असे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश करणारांनाही आश्वस्त केले. 

कल्याण- डोंबविली महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे गाजली होती. तरीही शिवसेनेने भाजपपेक्षा काही जास्त जागा जिंकून येथे सत्ता मिळवली. मनसेने येथे आठ-नऊ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व राखले होते. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील मनसेचा एकमेव आमदार याच भागातून निवडून आला होता. आमदार राजू पाटील यांनी येथे मनसेचे इंजिन रोवले. मात्र त्यांच्यात मतदारसंघातील मनसैनिकांना आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख