पीक विम्यासाठी माजी मंत्र्यांनी मंत्रालयातच मांडले ठाण 

मुख्यमंत्री होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांवर काढलेला तो मोर्चा म्हणजे नौटंकी होती का?
 Sanjay Kunte  .jpg
Sanjay Kunte .jpg

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून शासनाशी वारंवार चर्चा करूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यामुळे भाजप (BJP) आमदार व बुलडाणा जिल्हाध्यक्ष संजय कुटे (Sanjay Kute) हे आज (ता. १६ सप्टेंबर) मंत्रालयामध्ये उपोषणाला बसले आहेत. सरकारने अनेकदा आदेश देऊनही पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही, असेही कुटे म्हणाले. (Sanjay Kunte criticizes the state government) 

यावेळी कुटे म्हणाले, मुख्यमंत्री होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांवर काढलेला तो मोर्चा म्हणजे नौटंकी होती का? असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे. राज्य सरकाने शेतकऱ्यांचा फुटबॉल करणे बंद करावे. मुख्यमंत्र्यांनी त्या आंदोलनावेळी जी संवेदनशीलता दाखवली ती आता दाखवा, असा टोला कुटे यांनी मुख्यमंत्री यांना लगावला आहे. 

राज्य सरकारच्या वतीने कुटे यांना 15 दिवसांत बैठक घेऊ असे आश्वास दिले आहे. त्यानंतर 15 दिवसात बैठक झाली तर 16 दिवस माझा असेल, असा इशारा देत त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. महाराष्ट्राचे 200 कोटी रुपये आणि माझ्या मतदार संघातील 65 कोटी थकवले आहेत. 265 कोटी हा आमचा सेटल केलेला क्लेम आहे. नालायक कंपन्या खूप आहेत. त्यांच्या मानगुटीवर बसून पीक विम्याची रक्कम वसूल करा. त्या बैठकीत काही निर्णय होणार नाही माहीत आहे. आम्ही संयमी भूमिका घेतली आहे. मात्र, संयम सुटला तर राज्य सरकार जबाबदार असेल, असे कुटे म्हणाले. 

दरम्यान, मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग उद्ध्वस्त झाला असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. मदत द्यावी, अशी मागणी भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीवेळी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचलीच नाही. या वर्षी तरी आघाडी सरकारने पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवत न ठेवता शेतकऱ्यांपर्यंत थेट मदत पोचवावी आणि या संकटातून शेतकऱ्यांना सावरावे, असेही बागडे म्हणाले. 

मराठवाड्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपाचे पीक शंभर टक्के वाया गेले, तर सोयाबीन , कापूस ही पिके हातची गेली, ऊसह आडवा झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, पूर स्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत, असेही बागडे यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com