सचिन वाझे, रियाज काझी यांना थेट सेवेतून बडतर्फे करण्याच्या हालचालींना वेग... - Sachin Waze, Riaz kazi Action will be taken regarding the job NIA   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

सचिन वाझे, रियाज काझी यांना थेट सेवेतून बडतर्फे करण्याच्या हालचालींना वेग...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे ही कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातं.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवसास्थानाजवळ सापडलेली स्फोटके तसेच, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सुनील माने यांना निलंबित करण्यात आले आहे. या  प्रकरणात अटकेत असलेले आरोपी सचिन वाझे, रियाज काझी यांना आता थेट सेवेतून बडतर्फे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

कलम ३११ अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे ही कारवाई करणार असल्याचं सांगितलं जातं. दोघांच्या बडतर्फीचा अहवाल हा अंतिम टप्यात आहे. या संपूर्ण कटामुळे मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली. असे कार्य अशोभनिय असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दोघांवर कोणत्याही क्षणी बडतर्फीची कारवाई होऊ शकते. 

मनसुख यांची हत्या करण्यात आली त्यावेळी त्याच्या तोडांत ५ ते ६ रुमाल कोंबलेले होते. हे रुमाल दुसरं तिसरं कुणी नसून निंलबित पोलिस निरिक्षक सचिन वाझेनेच कोबंल्याचं सांगितलं जात आहे. कारण मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी वाझे हे सीसीटिव्हींची नजर चुकवत लोकलने  ठाणेला आला होता. त्यावेळी कळवा स्थानकावर त्याने हे रुमाल खरेदी केल्याचं सांगितलं जातं आहे. NIAच्या तपासात कळवा स्थानक परिसरातले CCTV तपासले असता. वाझेप्रमाणे एक व्यक्ती रुमाल खरेदी करत असल्याचे CCTV मध्ये कैद झालं आहे. CCTV अस्पष्ठ असला तरी देहबोली आणि कपड्याचा रंग ही वाझेच्या कपड्यासारखाच आहे. त्या अनुषंगाने इतर आरोपींकडे चौकशी केली होती.
 
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIAनं अटक केलेला पाचवा आरोपी सुनिल माने याच्या घरी NIA नं काल छापेमारी केली.या। वेळी NIAनं त्याच्या घरातून आणि कार्यालयातून काही महत्वाचे कागदपञ आणि मानेची लाल रंगाची क्रेटा कार हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे माने हे देखील त्याच्या कारचा नंबर बनावट वापरत असल्याचं तपासात समोर आलं होतं.

या आधी वाझेसोबत असलेला रियाझ काझी या एपीआयला देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेला मदत केली होती. निलंबित पोलिस विनायक शिंदेही एनआयएच्या कोठडीत आहे. त्यामुळे वाझेसोबत जे होते ते सर्वजण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला आहे. सुनिल माने हा मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होता. त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्याने मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख