सचिन वाझे हा अनिल देशमुखांना फक्त एकदाच भेटला  - Sachin Waze met Anil Deshmukh only once : Adv. Kamlesh Ghumre | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सचिन वाझे हा अनिल देशमुखांना फक्त एकदाच भेटला 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

ते पैसे अनिल देशमुख यांना दिले का? मग, त्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह काय करत होते?

मुंबई : न्यायमूर्ती चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे याचे जे प्रतिज्ञापत्र आलेले आहे, त्यात त्याने कुठेही म्हटलेले नाही की मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना पैसे दिले आहेत. आपण देशमुख यांना फक्त जानेवारीमध्येच भेटलो असल्याचे वाझे त्या प्रतिज्ञापत्रात सांगत आहे. त्यानंतर त्याने काहीही म्हटलेले नाही, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकिल अ‍ॅड. कमलेश घुमरे यांनी सांगितले. (Sachin Waze met Anil Deshmukh only once : Adv. Kamlesh Ghumre)

देशमुख यांचे वकिल कमलेश घुमरे यांनी आज (ता. १४ जुलै) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी वरील दावा केला आहे. अ‍ॅड. घुमरे म्हणाले की, आतापर्यंत माजी मंत्री अनिल देशमुख, त्यांचा मुलगा ह्‌षीकेश, पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स आलेले आहे. पण, त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना अद्याप तरी समन्स आलेले नाही. आरती देशमुखांना आजच्या तारखेसाठी समन्स आले होते, असेही अ‍ॅड. घुमरे यांनी या वेळी सांगितले.   

हेही वाचा : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? गांधी परिवारासोबतच्या भेटीतून संकेत

सचिन वाझे याने चौकशी समितीला काही ठोस उत्तरे दिलेले नाहीत. फक्त एकदा जानेवारीत अनिल देशमुख यांना भेटल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे सचिन वाझे याने केलेले आरोप खोटे आहेत. सचिन वाझे याला बारवाल्यांनी 4 कोटी रुपये दिले आहेत. मात्र, ते पैसे अनिल देशमुख यांना दिले का? मग, त्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह काय करत होते? परमवीर सिंह यांनी केलेले आरोपही सर्रास खोटे आहेत, असा दावा देशमुखांचे वकिल घुमरे यांनी केला.

अ‍ॅड. घुमरे म्हणाले की, सचिन वाझे याने सीबीआयला आणि ईडीला वेगळे जबाब दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आरोपात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. कमिशनमध्ये आरोपाचे पुरावेही दिलेले नाहीत.

दरम्यान, मुंबईतील बारच्या संख्येसंदर्भातही अ‍ॅड. घुमरे यांनी खुलासा केला आहे. बारची 1750 असे सांगण्यात येत असलेली संख्याही खोटी आहे. मुंबईच माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी 200 बार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य दिसून येत नाही, असे घुमरे यांनी नमूद केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख