''मला जामिनावर सोडा'' सचिन वाझेची NIA न्यायालयाकडे विनंती - sachin waze filed bail plea in special nia court | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

''मला जामिनावर सोडा'' सचिन वाझेची NIA न्यायालयाकडे विनंती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

NIAनं अटक केल्यानंतर  90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करता आले नाही

मुंबई : निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin waze याने ची एनआयए कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. NIAनं अटक केल्यानंतर  90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करता आले नाही, या आधारे त्याने जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचे अद्याप यावर निकाल दिलेला नाही. सचिन वाझे सध्या तळोजा तुरुंगात आहे. sachin waze filed bail plea in special nia court 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. हिरेन हत्येप्रकरणी वाझे,  माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची चैाकशी सुरु आहे.  ‘ईडी’कडूनही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे.  

सचिन वाझे यांच्या चौकशीची परवानगी एनआयएनं ईडीला दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची  NIA कडून चौकशी करण्यात येत आहे.  

एनआयएने शर्मा यांचा निकटवर्तीय सायन येथील व्यापारी राजू राव याला NIA ने चौकशीसाठी नुकतेच ऑफिसला बोलवले  होते. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठिकुरी आणि मनिष सोनी हे नेपाळ येथे गेले होते. या चारही आरोपींना नेपाळला जाण्यासाठी राजू राव याने मदत केली असल्याची माहिती एनआयएला तपासात मिळाली आहे. 

राजू राव याने चैाकशीत सांगितलं की, या चारही जणांची नेपाळला जाण्याची व्यवस्था शर्मा यांच्या सांगण्यावरुन केली होती. पण या चारही जणांवर असलेल्या आरोपांबाबत मला माहिती नव्हती, असे राजू राव याने सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख