मिठी नदीत NIA ला सापडलेल्या नंबर प्लेटबाबत मोठा खुलासा...

एनआयएला मिळालेल्या नंबर प्लेट चोरीला गेलेल्या कारच्या असल्याची माहिती समोर आली आहे.
Sachin waze case The number plates found in Mithi river belong to Vijay Nades car
Sachin waze case The number plates found in Mithi river belong to Vijay Nades car

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपासासाठी काल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मिठी नदीत शोध मोहिम राबवली. या सर्च अॉपरेशनमध्ये एक लॅपटॉप, (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर्स) डीव्हीआर, सीपीयू, वाहनांच्या दोन नंबर प्लेट यांसह आणखी काही वस्तु एनआयएच्या हाती लागल्या आहेत. वाहनाच्या नंबर प्लेटबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 

निलंबित पोलिस अधिकारी व या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सचिन वाझेलाही मिठी नदी परिसरात आणण्यात आले होते. वाझेने काही वस्तू नदी पात्रत टाकल्याची कबुली एनआयएलला दिली होती. त्यानुसार एनआयएने हे अॉपरेशन राबवले. यामध्ये दोन नंबर प्लेट मिळून आल्या आहेत. एमएच 20 एफपी 1539 या क्रमांक या प्लेटवर आहे. 

त्यानंतर आज या नंबर प्लेट असलेल्या कारच्या मालकाचा शोध लागला आहे. विजय नाडे असे या मालकाचे नाव आहे. मिठी नदीमध्ये एनआयएला सापडलेल्या नंबर प्लेट आपल्याशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नाडे हे औरंगाबाद येथील छत्रपती नगरमधील रहिवासी आहेत. जालना येथील समाजकल्याण विभागात लिपीक म्हणून काम करतात. औरंगाबादमदील उद्धवराव पाटील चौकातून त्यांची कार चोरीला गेली होती. 

''माझी कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी चोरीला गेली होती. त्याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याची प्रतही माझ्याकडे आहे. मागील तीन महिने त्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. मात्र काल, याबाबत मला कळविण्यात आले,'' असे नाडे यांनी सांगितले आहे. 

डीव्हीआरमधून मिळणार महत्वाची माहिती

नदीपात्रात सापडलेल्या वस्तू मनसुखची हत्या होईपर्यंत वाझेच्याच ताब्यात असल्याचे एनआयएतील सुत्रांनी सांगितले. नदीपात्रात सापडलेले डीव्हीआर वाझे राहत असलेल्या सोसायटीतील आहे. याच इमारतीच्या आवारात 17 ते 24 फेब्रुवारीदरम्यान स्कॉर्पियो कार उभी करण्यात आली होती. तसेच ज्या ठिकाणी नंबर प्लेट बनविल्या आणि वाझेने ये-जा केलेल्या इतर ठिकाणचे व्हिडिओ असलेल्या डीव्हीआर असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली. 

NIA साठी ही सा ठिकाणे महत्वाची 

1. मुलूंड - सचिन वाझेने गुन्ह्यातील शर्ट जाळला.
2. माहिम - वाझेने गुन्ह्यातील काही पुरावे माहिम खाडीत टाकल्याचे समजते.
3. मनसुख हिरेन यांचे दुकान - दुकानातील सीसीटीव्ही वाझेने त्याच्या सहकाऱ्यांकरवी काढून नेले
4. वाझे राहत असलेली इमारत - गुन्ह्यातील गाडी याठिकाणाहून हस्तगत करण्यात आली. तसेच वाझेने इमारतीतील डीव्हीआर मिठीत नदीत फेकल्याचा संशय.
5. बीकेसी परिसरातील मिठी नदी पात्र - वाझे नदीत काही पुरावे फेकले होते. काल सर्च अॉपरेशनमध्ये काही पुरावे एऩआयएच्या हाती लागले आहेत. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com