टीआरपी घोटाळ्यात सचिन वाझेंनी 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप  - Sachin Waze accused of taking bribe of Rs 30 lakh in TRP scam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

टीआरपी घोटाळ्यात सचिन वाझेंनी 30 लाखांची लाच घेतल्याचा आरोप 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 एप्रिल 2021

टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्हना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : एनआयए (राष्ट्रीय तापस यंत्रणा) अटकेतील निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही (TRP Scam) सचिन वाझेंनी 30 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बार्क (BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्हना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याचे बोलले जात आहे.

कोरोना नियंत्रणासाठी पावले उचला सोनिया गांधी यांच्या काँग्रेसशासित राज्यांना सूचना

भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी 'सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा 15 मार्च 2021 रोजीच केला होता' याकडे निर्देश करणारे ट्विट केले आहे. शेलार यांनी म्हटले आहे की ''या "एन्काऊंटर स्पेशल" अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का? त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का? कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले? कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार? सत्य समोर यायला हवे!

दरम्यान, सचिन वाझे Sachin Waze प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या Mumbai Police क्राईम इंटिलिजन्स युनिटचा सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला अटक केली आहे. एपीआय रियाझुद्दीन काझी हा १०२ व्या बॅचचा पोलिस अधिकारी आहे. २०१०  मध्ये त्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रशिक्षणानंतर त्याचे प्रथम पोस्टिंग वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पीएसआयच्या पोस्टवर झाले. जेथे त्याने प्रोबेशन पीरियडवर काम केले. 

लशीचे राजकारण : सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात अन् सर्वांत जास्त लशी भाजपच्या राज्यांना
 

रियाज काझी हा ज्या सीआययू विभागात काम करत होता, त्याचे नेतृत्व सचिन वाझे करत होता. एनआयएने या संपूर्ण कार्यालयाची झडतीही घेतली होती. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएचे अधिकारी रियाज काझीला बोलावून वारंवार त्याच्याकडे चौकशी करत होते. अखेर  त्याला अटक करण्यात आली.  

Edited By - Amol Jaybhaye
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख