"जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय.. "सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ - sachin vaze shocking whatsapp status time has come to say good bye to the world  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

"जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय.. "सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. 

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे.  'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. 

सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटक पुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. 

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेंना अटक करण्याची मागणी भाजपने  केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबतचे टि्वट सोमय्या यांनी केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये किरीट सोमय्या म्हणतात, "शिवसेनचे माजी प्रवक्ता पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. एटीएस चा आत्ता निष्कर्ष आहे की मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे. मग ठाकरे सरकार सचिन वाझे यांना अटक का करत नाही."

सचिन वाझे याच्यासारख्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सरकार इतके का घाबरते असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. या सरकारचे असे नेमके काय गुपीत त्याच्याकडे आहे जे सरकारला त्रासदायक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख