सचिन सावंत म्हणतात...फडणवीस मोठे नेते पण... - Sachin Sawant says Fadnavis is a great leader but | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन सावंत म्हणतात...फडणवीस मोठे नेते पण...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 28 मार्च 2021

सचिन वाझे प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-पत्यारोप सुरु आहेत.

मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-पत्यारोप सुरु आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. 

होळी घरात पेटवायची का? राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार, असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर सावंत यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. सावंत म्हणाले की ''आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे. मात्र, माझी विश्वासार्हता ही फडणवीस यांच्यापेक्षा कांकणभर जास्त आहे'', असा टोला सावंत यांनी फडणवीसांना लागावला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस? 

देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी सावंत यांची खिल्ली उडवली. सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. दररोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असे म्हणत फडणवीस यांनी सावंत यांची खिल्ली उडवली होती.   

सावंत काय म्हणाले होते? 

भारतीय जनता पक्षाने परवमीरसिंह यांच्या चौकशीची मागणी करणे थांबवले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन हत्या याकडून दुसरीकडे लक्ष जावे हा भाजपचा प्रयत्न असल्यानेच मुख्य मुद्दा बाजूला सारून संबंध नसलेल्या इतर प्रकरणावर बेफाम आरोप केले गेले, सातत्याने गोलपोस्ट बदलले गेले. रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे केलेल्या फोन टॅपिंगचा अहवाल समोर आणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले होते त्याची हवा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सत्यदर्शक अहवालाने काढून टाकली. 

रश्मी शुक्लांवर होणारे आरोप खोटे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत...
 

आता ६.३ जीबीचा पेन ड्राईव्ह जर रश्मी शुक्ला यांनीच सरकारला दिला नाही तर फडणवीस यांनी हा पेन ड्राईव्ह कोठून मिळवला. केंद्रीय गृहसचिवांना खोटी माहिती देऊन महाराष्ट्राला बदनाम केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. परंतु 'गिरे तो भी टांग उपर' अशी फडणवीस यांची भूमिका आहे, अशी टीका सावंत यांनी केली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख