...हे तर बंटी-बबली निघाले!  

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घातल राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
 Ravi Rana, Navneet Rana .jpg
Ravi Rana, Navneet Rana .jpg

मुंबई : आमदार रवी राणा  (Ravi Rana) यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घातल राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले होते. तर खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर अक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. (Rupali Chakankar's criticism of Ravi Rana) 

या संदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले'' असा टोला त्यांनी लागवला आहे.  

सोमवारी विधानसभेमध्ये (Assembly Session) ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. भाजपने विधानसभेच्या आवारामध्येच प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले. तर दुसरीकडे आमदार रवी राणा  (Ravi Rana) यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घातल राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.

रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजदंड उचलण्यासाठी पुढे गेले असता जाधव यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्टंटबाजी करु नका. तुम्हाला बोलायची संधी मिळेल, असे जाधव यांनी राणा यांना सांगितले. मात्र राणा थांबले नाहीत. त्यामुळे जाधव यांनी सभागृहातील आपल्या अध्यक्षांच्या खुर्चीमधून उठून रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले होते. 

नवनीत राणा या आमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायलयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दिलासा दिला आहे. त्यावरुन चाकणकर यांनी पती-पत्नीवर निशाणा साधला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com