सरसंघचालक मोहन भागवत रुग्णालयात दाखल..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे.
2RSS_20Chief_20Mohan_20Bhagwat.jpg
2RSS_20Chief_20Mohan_20Bhagwat.jpg

नागपूर : .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांची  कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्वीटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे.  सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. 

शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉ. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कोरोनाची सामान्य लक्षण दिसत आहेत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

ता. 6 मार्च रोजी मोहन भागवतांनी कोरोना लशींचा पहिला डोस घेतला होता. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही कोरोना लस घेतली होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कोरोना लसीकरण केले होते. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीनेही संस्थेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

हेही वाचा  : शंभर टक्के लॉकडाउन तूर्तास तरी नाही....

मुंबई : ''लगेचच 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा विषय तूर्तास तरी नाही, निर्बंध कडक करणं आणि त्यांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई करू शकतात. माझं महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे. सरकारला सहकार्य करा,'' असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, 30 एप्रिलपर्यंत राज्यात अॅक्टिव्ह केसचा आकडा 11 लाखापर्यंत पोहोचेल. यातील 20 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागेल, असा अंदाज धरला तर, दोन-अडीच लाख लोकांना ऑक्सिजन, आयसीयू सेवा लागतील. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्याला दररोज दीड लाख रॅमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे. दुप्पट इंजेक्शन मिळाले तर लोकांना याचा फायदा होईल. रॅमडेसिव्हिर उत्पादकांनी 20 दिवसांचा अवधी मागितला आहे. 

 Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com