रोहित पवार म्हणाले, " निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत ! '

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी काल दिली होती.
रोहित पवार म्हणाले, " निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत ! '

मुंबई : "" निलेश राणेजी लवकर बरे, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत असे ट्‌विट करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर निलेश म्हणाले, मी आपला आभारी आहे

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी काल दिली होती. 

निलेश यांनी ट्विट करीत आपणास कोरोना झाल्याचे म्हटले होते. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी असे आवाहनही निलेश राणे यांनी केले आहे. 
निलेश राणे यांना कोरोना झाल्याचे कळताच रोहित पवार यांनीही त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. 

निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैरी या ना त्या कारणाने झडत असतात. निलेश राणे तर कोणाचीच भीडभाड न ठेवता रोखठोक ट्विट करीत असतात. त्यामधून रोहितही सुटत नाहीत. तसेच रोहितही त्यांना आपल्या पद्धतीने उत्तर देत असतात.

काही असले तरी राजकारणापलिकडे जावून नेते मंडळी एकमेकांना आरोग्यासाठी शुभेच्छा देत असतात. निलेश राणेजी लवकर बरे व्हा, सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत असे रोहीत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यात कोरोना आल्यापासून आता पर्यंत काही राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील तसेच खासदार फौजिया खान आदींचा समावेश होता. या सर्व नेत्यांना कोरोना झाला होता पण, हे सगळे नेते कोरोनातून बरे झाले आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com