रोहित पवारांना जी भिती होती, ती अखेर खरी ठरली! - Rohit Pawar had expressed the possibility of fuel price hike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

रोहित पवारांना जी भिती होती, ती अखेर खरी ठरली!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 4 मे 2021

देशातील पाच राज्यांतील निवडणुका (Election) संपल्यानंतर मोदी सरकारने (PM Modi) इंधन दरवाढ केली आहे.

मुंबई : देशातील पाच राज्यांतील निवडणुका (Election) संपल्यानंतर मोदी सरकारने (PM Modi) इंधन दरवाढ केली आहे. पेट्रोल व डिझेलच्या (Petrol and Disel Price ) दरात 18 दिवसांनंतर वाढ करण्यात आली आहे. तसेच यापुढील काळातही दरवाढ होतच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकांमध्ये काही दिवस नागरिकांना दिलासा मिळाला होता. रविवारी निवडणुकांचा निकाल झाला अन् दोन दिवसांनीच इंधन दरवाढ (Fuel Price) करण्यात आली.

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी इंधन दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली होती. ''चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!,'' असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. हे ट्विट त्यांनी 2 मे रोजी केले होते. पवारांच्या ट्विटनंतर दोन दिवसांतच इंधर दरवाढ झाली आहे. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा ट्विट करत ''जी भिती होती, ती अखेर खरी ठरली,'' असं म्हटलं आहे. 

हेही वाचा : जगातील सर्वात महागडा घटस्फोट? बिल अन् मेलिंडा गेट्स 27 वर्षानंतर होणार वेगळे

दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुकांचा प्रचार रंगात येण्यापूर्वी देशात दररोज इंधन दरवाढ होत होती. त्याविरोधात विरोधकांनी रान उठवले होते. निवडणुक प्रचारातही हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात होता. काही राज्यांत पेट्रोलचे दर शंभरीपार गेल्याने  मोदी सरकार बॅकफूटवर गेले होते. त्यामुळे इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यात आला. निवडणुका पार पडेपर्यंत एकदाही दरवाढ झाली नाही.

अखेर निवडणुका संपल्यानंतर मोदी सरकारने संधी साधत 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ करण्यास सुरूवात केली आहे. इंधन कंपन्यांनी आजपासून पेट्रोलच्या दरात 12 ते 15 पैशांनी वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 15 ते 18 पैशांनी वाढले आहेत. 

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 90.55 रुपयांवरून पोहचले असून मुंबईत 96.95 रुपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोल 12 पैशांनी महागले आहे. चेन्नईतही पेट्रोल 12 पैशांनी महागले असून 92.55 रुपयांवर पोहचले आहे. मुंबईतील डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली असून ते 87.98 रुपयांवर गेले आहेत. 

देशात इंधरवाढीमध्ये 15 एप्रिल रोजी शेवटची कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर 16 पैशांनी तर डिझेलचे दर 14 पैशांनी कमी झआले होते. त्याआधी सलग दोन आठवडे इंधन दरात सातत्याने वाढ होत होती. देशात 24 मार्चपासून पेट्रोलच्या दरात 77 पैशांची तर डिझेलच्या दरात 74 पैशांची घट झाली होती. तर 2021 मध्ये पेट्रोलचे दर 7.46 रुपये आणि डिझेलचे दर 7.60 रुपयांनी वाढले आहेत. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख