घंटा बडवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल  - Ring the bell, ring the plate, this is your Hindutva, Uddhav Thackeray's attack on BJP | Politics Marathi News - Sarkarnama

घंटा बडवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

दसरा मेळावात बोलताना ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढविला.

मुंबई : मी मुख्यमंत्री झाल्यापासून हे सरकार पडेल असे सांगणाऱ्या मंडळीनाड(भाजप) मी सांगू इच्छितो की तुमच्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. 

दसरा मेळावात बोलताना ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढविला. शिवसेनेचा मेळावा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. काही मोजक्‍या मंडळींच्या उपस्थित हा मेळावा पार पडला. प्रारंभी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे भाषणाला उमे राहिले. त्यांनी भाषणाला सुरवात करतानाच विरोधकांना विशेषत: भाजपला आव्हान दिले. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे सांगितले. 

संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ठाकरे यांचे भाषण म्हणजे भाजपला जोरदार तडाखे दिले. 

हरियाणाचा मुख्यमंत्री कुलदीप वैष्णोवी होणार असे भाजपने सांगितले होते, पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला. नितीशकुमारांबाबत जो डाव केला जात आहे.तोच डाव शिवसेनेबाबत 2014 मध्ये भाजपने शिवसेनेविषयी केला असा जोरदार तडाखा ठाकरे यांनी भाजपला लगावला. मला एक तरी उदाहरण दाखवा की मी मित्राला दगा दिला आहे. मात्र, भाजपने आम्हाला दगा दिला आहे.

हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली, पण, जे सेक्‍यूलरची भाषा करतात जे मोदींना विरोध करतात. नितीशकुमार जर सेक्‍यूलर पीएम पाहिजे असे सांगत होते. त्याच जेडीयूशी भाजप युती करतो आणि आम्हाला धडे शिकवितो. लाज वाटली पाहिजे यांना. अशा शब्दात ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषण करताना प्रारंभी धम्म परिवर्तनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, की हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे आव्हान भाजपला त्यांनी दिले. ते म्हणाले, की आज वेगळ्या परिस्थितीत शिवसेनेचा मेळावा होत आहे. याची मला जाणीव आहे.

मुख्यमंत्रीपदाचा मान ठेवून मी बोलत आहे असे सांगताना ते म्हणाले, की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ही माती सांधुसंताची आहे. घरात घरात तुळशी वृंदावन आहे, येथे गांजा शेती नाही. वाघाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

शिवसेनेला घंटा बडवा, थाळ्या बडवा हेच तुमचे हिंदुत्व असेल तर आम्हाला ते मान्य नाही. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रापासून मुंबई तोडून देणार नाही असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख