रिक्षाचालकांना तातडीने मिळणार दीड हजार रुपये; अनिल परबांनी घातले लक्ष

''राज्यात लॅाकडाऊन जाहीर करतांना हातावरती पोट असणार्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या.
  Anil Parab .jpg
Anil Parab .jpg

मुंबई : ''राज्यात लॅाकडाऊन जाहीर करतांना हातावरती पोट असणार्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एक होती ती म्हणजे रिक्षा चालकांना दिड हजार रुपये देण्याची. हे दिड हजार रुपये देणे सोयीचे व्हावे यासाठी मंगळवारी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रालयात रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. राज्यात जवळपास ७. ५० लाख परवानाधारक रिक्षा चालक आहेत. त्यांना ही मदत मिळणार असल्याचे परब यांनी सांगितले.  

''सर्व परवनाधारक रिक्षा चालकांनी त्यांची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावीत. जेणे करून लवकरच आम्हाला त्यांना मदत देणे शक्य होणार आहे. ही बँक खाती आधार कार्डशी लिंक झाली तर भविष्यातही आम्हाला रिक्षा चालकांसाठी निर्णय घेता येईल.  त्यासाठी मी राज्यातील परवानाधरक रिक्षा चालक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आधार कार्ड लवकर बँक खात्याशी लिंक करावीत'', असे आवाहन परब यांनी केले.  हे परवानाधाक रिक्षा चालकांचे अकाऊंट नंबर आणि आधार कार्ड आमच्याकडे नाहीत. त्यामुळे ही आर्थिक मदत त्यांना देणे सोयीचे व्हावे यासाठी आज आम्ही सर्व रिक्षा चालक संघटनांना विनंती केली'' असल्याचे परब यांनी सांगितले.

''या संदर्भातील जो फाँर्म आहे तो आम्ही आमच्या संकेतस्थळावर टाकणार आहोत. तसेच रिक्षा युनियनच्या प्रतिनिधींकडेही उपलब्ध करुण देणार आहोत. वर्तमान पत्रांच्या जाहीरातींमध्येही देण्यात येणार आहे. हा निर्णय घेतला आहे. तो परवाना धारक रिक्षा चालकांसाठीच आहे. पैशांचे वितरण बँकांच्या मार्फतच होणार'' असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.    

''कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या पाहता. अशीच परीस्थिती राहीली तर रुग्णांचे हाल होतील. आजच आँक्सिजन, बेड व्हेटीलेटरचा तुटवडा जाणवतोय. अशा परीस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर कडक निर्बंधांची गरज आहे. ''राज्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्यक गोष्टी घेता येतील. याव्यतिरीक्त घरपोच सेवा रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहे. या घरपोच सेवेचा नागरिकांना फायदा होईल. कोणी काही टिका केली तरी सरकार म्हणून काही निर्णय घेणे आवश्यक आहे. आज लोकांच्या जीवाचा प्रश्नं आहे. त्यांच्या हिताचा जो निर्णय आहे, तो सरकार म्हणून घेतला'', असल्याचे परब म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमध्ये ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचे म्हटले आहे. त्या विषयी विचारले असता म्हणाले'' अमित शहा जे काही बोलतात त्यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल. आज लोकांचा प्रश्नं जीवन मरणाचा आहे. आणि आमचे सर्व लक्ष लोकांचा जीव वाचवण्यावर आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.     
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com