ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण 

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता,त्यामध्ये कोणताही बदल न करता, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे.
 Ashok Chavan .jpg
Ashok Chavan .jpg

नांदेड : ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधक कारण नसताना गैरसमज पसरवत आहेत ते चुकीचं आहेत, असेही ते म्हणाले.   

ओबीसी समाजाच्या वतीने (ता. २४ जानेवारी) रोजी जालण्यात मोर्चा काढण्यात आला. त्या संदर्भात चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भातील शासनाची भूमिका आम्ही याआधीच स्पष्ट केली आहे.

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यामध्ये कोणताही बदल न करता, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, हीच सरकारची भूमिका आहे. यामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम विरोधक करत असतील, तर ते चुकीचं आहे. सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. आजही तिच भूमिका आहे. महाविकास आघाडीतही यासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत."

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याचा संयुक्त असलेल्या बाभळी बंधाऱ्याच्या पाणी विसर्गाविषयी बोलताना चव्हाण म्हणाले की, "बाभळी बंधाऱ्यांच्या पाणी विसर्गाविषयी सर्वोच्च न्यायालयानं मागे निर्णय दिला होता. बंधाऱ्याचे गेट उघडे असल्यामुळे महाराष्ट्राचं पाणी तेलंगणात वाहून जात आहे.

यावर्षी पाऊस चांगला झाला पण, बाभळी बंधाऱ्याचा गेट उघडे असल्यामुळे पुराचं पाणी समुद्रात वाहून गेल, त्यामळे तेलंगणानं पूर कमी झाल्यानं पोचमपाट धरणात पाणी अडवावं. या विषयावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं बोलणं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालं, पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही." 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या विषयावर महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील यांनी राज्यातील मंत्री, नेते आमदारांचे मतं जाणून घेतली आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असावी. आता निर्णय पक्षाध्यक्षांनी घ्यायचा आहे.


वडेट्टीवार काय म्हणाले होते? 

ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला केले. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांकडेही त्यांनी ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण, मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्क लावू नका. आम्ही कोणाच्या हक्काचे मागत नाही. आमच्या हक्काचे आम्हाला द्या, आमच्या हक्काचे कोणी काढून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. 

या मेळाव्याला सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे ओबीसींच्या लढाईला पक्षीय स्वरुप देऊ नका. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींच्यासाठी मोठे काम केले त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसींच्यासाठी काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

राजेंद्र कोंढरे काय म्हणाले होते?

राज्याचे मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना सर्व घटकांना समान न्याय देण्याची शपथ घेतली. मात्र, मंत्रीपदावर बसून मराठा विरोधी भूमिका घेत सर्वप्रथम सारथीची आपण राखरांगोळी केली. त्यानंतर अनेक वेळा मराठा समाजाविरोधी जाहीर स्टेटमेंट आपण दिलीत. मुळात कुठल्या समाजाने ओबीसीमध्ये यावे आणि येऊ नये हे सांगणारे विजय वडेट्टीवार कोण? असा प्रश्‍न मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com