महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना , मुख्यमंत्री अध्यक्ष

शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना , मुख्यमंत्री अध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. 

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील.

शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदिप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत कार्यरत असेल.

आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार : भुजबळ 
मुंबई : महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले होते यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातल्या अनेक भागांमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्‍यात आज मी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे अशी माहीती राज्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले,काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्‍या निराधार कुटुंबाना मोफत अन्न धान्य पुरवठा करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील विविध भागात की ज्यात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेलेले आहेत. काही घरे देखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अश्‍या पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब किलो गहू, किलो तांदूळ आणि लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com