खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय 

उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते.
3Navnit_20Rana_0 - Copy.jpg
3Navnit_20Rana_0 - Copy.jpg

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा आहे. उच्च न्यायालयाने राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन राणा खासदार म्हणून निवडून आल्या. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. relief to mp navneet rana decision of supreme court in the case of cancellation of caste certificate

उच्च न्यायालयाने प्रमाणपत्र रद्द केल्यानं नवनीत रवी राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक असून दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी खासदार नवनीत राणा यांचे वकील जेष्ठ विधिज्ञ अँड. ढाकेपालकर आणि अँड. गाडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर तुर्तास नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.  

न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अश्या न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिल्याचंही नवनीत राणा यांनी पत्रामध्ये म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला होता.

विजय शिवतारेंच्या पत्नीचे गंभीर आरोप  ; २७ वर्षापासून माझ्यापासून अलिप्त 
पुणे : माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये  (ICU) आहेत. त्यांच्या कन्या ममता लांडे-शिवतारे यांनी याबाबत कौटुंबिक वादाबाबत फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. याला विजय शिवतारे यांची पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी हे आरोप खोडले आहेत. त्यांनी फेसबूक लाईव्ह करीत या आरोपांना उत्तर दिले आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com