कोकणात आज रेड अलर्ट 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (ता.3) अतिवृष्टी होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.
Rain.jpg
Rain.jpg

मुंबई : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (ता.3) अतिवृष्टी होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. काही भागांमध्ये 200 मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा  अंदाज आहे; तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.  काही भागात 200 मि.मी पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. सखल भागात पूरपरिस्थिती ओढवण्याची शक्‍यताही वर्तवण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोमवारी वेधशाळने रेड अलर्ट जारी केला आहे. नाविक दल, तटरक्षक दल, तसेच स्थानिक प्राधिकरणांना सज्ज राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार ते गुरुवार या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईसाठी नाविक दल, कोस्टगार्डची टिम सज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही तयार ठेवण्यात आले आहे. पाणी साचण्याची शक्‍यता असलेल्या भागात बचावासाठी आवश्‍यक उपकरणे तयार ठेवण्यात आली आहेत. तसेच आवश्‍यकतेनुसार शाळांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत निवारा केंद्र बनवण्याची तयारी ठेवण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

समुद्राला सोमवारी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी 4.44 मिटरची भरती येणार आहे. या काळात समुद्राजवळ जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. त्याचबरोबर या काळात मोठा पाऊस झाल्यास शहरात पाणी साचण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.    

मुंबईत रविवारी काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या. कुलाबा येथे कमाल 32 आणि किमान 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 33.5 कमाल, तर 26.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. दोन्ही ठिकाणी पावसाची नोंद झालेली नाही.


 

हेही वाचा : ठाकरे सरकार पाच वर्षे टिकणारच, थोरातांचे राज ठाकरेंना उत्तर

मुंबई : महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे राज ठाकरे म्हणतात.मात्र ते कशाच्या आधारे ही भविष्यवाणी करतात,असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. एकीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही ठाकरे सरकारवर टीका करीत असतात. आपआपसातील मतभेदामुळे हे सरकार कोसळेल असे ते सांगत आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेविषयी आशावादी आहेत. मात्र जे फडणवीस सांगत आहेत ते आता राज ठाकरेही सांगत आहे. हे सरकारच टीकणार नाही असा त्यांचा दावा आहे. राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार थोरात यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की ठाकरे सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल,असा मला आत्मविश्वास आहे. सरकार जास्त काळ टिकणार नाही. अशी भविष्यवाणी राज ठाकरे हे कशाच्या आधारे करतात, हेच मला समजत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com