मुंबई पोलिसांच्या समन्सला शुक्ला यांचे उत्तर; चौकशीची खूपच घाई असेल, तर....

मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावला होता. त्यानुसार आज चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते
 Rashmi Shukla .jpg
Rashmi Shukla .jpg

मुंबई : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला, यांना मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावला होता. त्यानुसार आज चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला सांगितले असल्याची माहिती आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले होते. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.

या प्रकरणी आता रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनीच समन्स पाठवले होते. या प्रकरणातील तपासामध्ये सहकार्य करण्यास सांगितले होते. रश्मी शुक्ला यांना बुधवारी उपस्थित राहण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता तपासाला मुंबईत येता येणार नसल्याचे शुक्ला यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हैद्राबाद येथे आज सीबीआयने  रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. या संबंधात समाजमाध्यमातून काही तपशील बाहेर येत आहेत. या जवाबातून फार संवेदनशील माहिती समोर येईल असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी शुक्ला यांना समन्स बजावला आहेच. पण त्या आधीच सीबीआयने ते सध्या तपास करत असलेल्या प्रकरणी साक्ष नोंदवली आहे.

फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. मुंबईतील सायबर पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com