"रश्मी शुक्ला पुण्यात बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या.." राठोडांचा गंभीर आरोप.. - rashmi shukla running extortion racket while commissioner of pune says haribhau rathod | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

"रश्मी शुक्ला पुण्यात बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या.." राठोडांचा गंभीर आरोप..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात गुंतले आहेत. रश्मी शुक्ला या खंडणीबहादर अधिकारी आहेत, असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. 

मुंबई : "आयपीएस रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना त्या पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फेत खंडणी गोळा करायच्या," असा आरोप बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  

राठोड म्हणाले, "पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी असताना रश्मी शुक्ला या पोलिस निरीक्षक धुमाळ यांच्यामार्फेत खंडणी गोळा करायच्या. त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण रफा दफा केलं होतं. देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात गुंतले आहेत. रश्मी शुक्ला या खंडणीबहादर अधिकारी आहेत."

रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ होते. संदीप जाधव यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केवळ धनंजय धुमाळला निलंबित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.  

रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना खंडणी गोळा करायच्या, असे राठोड यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत हा सारा कारभार सुरु होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पडदा टाकला, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.  

हरिभाऊ राठोड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे आरोप केले आहेत. पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ पोलिसांनी प्रॉपर्टी सेलमध्ये बोलावून धमकावत असत. ते रश्मी शुक्ला यांच्या नावाने पैसे मागायचे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपींगच्या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्‍मी शुल्का यांच्यावर गंभीर आरोप सत्ताधारी पक्षातील मंत्री करत आहेत. त्यानिमित्ताने रश्‍मी शुक्ला या पुण्याच्या पोलिस आयुक्त असताना पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी त्यांच्या नावाने २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. यामध्ये शुक्ला यांनी धुमाळ यांना निलंबित केले होते.  आयपीएस (IPS) अधिकारी के. के. पाठक सेवानिवृत्तीनंतर रश्मी शुक्ला यांच्याकडे पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे आली होती. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. या पहिल्याच बैठकीत ‘ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, भ्रष्टाचार होत असेल, तर त्याला पोलिस निरीक्षक जबाबदार असेल’ असा दम भरला होता.यामुळे शहरात पोलिसांसाठी आनंददायी नाही पण नागरिकांसाठी तरी खुशालीचे वातावरण निर्माण होईल असे वाटले होते. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी घेऊन थेट माझ्याकडे यावे असे आवाहन करत त्यांचा मोबाईल क्रमांक भर कार्यक्रमांमधून पुणेकरांसमोर जाहीर केला होता. त्यामुळे आयुक्त शुक्लांबद्दल अतिशय चांगले वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आयुक्तालयात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह, व्यावसायिक, जमीनदार यांची गर्दी वाढायला लागली होती. त्यांची दखल घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना शुल्का यांच्याकडून दिले जात होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख