रश्मी शुक्ला यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; न्यायालयात धाव - Rashmi Shukla makes serious allegations against the police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

रश्मी शुक्ला यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; न्यायालयात धाव

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला सांगितले होते.

मुंबई : राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक व तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त राज्य रश्मी शुक्ला यांना सायबर पोलिसानी समन्स पाठवले आहे. 

त्यानुसार शुक्ला यांना बुधवारी (ता. २८ एप्रिल) चौकशीला हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना चौकशीला हजर राहता येणार नसल्याचे सांगितले होते. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला सांगितले होते.

शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

त्यानंतर सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना दुसरे समन्स पाठवले होते. मात्र, फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर रित्या समन्स पाठले असल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला आहे. या आरोपा विरोधात शुक्ला यांनी हैद्राबाद कोर्टात धाव घेत. याचिकाही दाखल केली आहे. दोन समन्स आतापर्यंत शुक्ला यांना पाठवण्यात आले आहे. माञ चौकशीला शुक्ला या सहकार्य करत नसल्याची सूञांनी माहिती दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी तत्कालीन गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले होते. हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. 

रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!
 

मुंबईतील सायबर पोलिस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे. 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत हैद्राबाद येथे बुधवारी सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. त्या चौकशीत शुल्का यांनी अनेक गौप्यस्फोट केले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळर यांनी म्हटले होते.

त्या संदर्भात भातखळकर यांनी एक ट्वीट केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की ''आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे'' असा टोला भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकाला लगावला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख