राणेंच्या विधानाचे समर्थन नाही, पण पक्ष राणेंच्या पाठीशी

पोलिसांना मी सल्ला देत आहे धमकी नाही असे फडणवीस म्हणाले.
राणेंच्या विधानाचे समर्थन नाही, पण पक्ष राणेंच्या पाठीशी
3Devendra_Fadanvis_9.jpg

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे राज्यातील विविध भागात तिव्र पडसाद उमटत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना अटक केली जाऊ शकते. याबाबत बोलतांना देवेंद्र फडणवीसयांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, आम्ही राणे यांच्या वक्तव्याच समर्थन करणार नाही. मात्र, राणे यांच्या सोबत पक्ष म्हणून आहोत.

फडणवीस म्हणाले की, सरकारकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात असून, पोलिसांचा वापर केला जात आहे आणि सरकारला खूश करण्यासाठी पोलीस काम करत आहेत. जेंव्हा केंद्रीय मंत्र्याला निर्लज्ज म्हणता, लाथा मारण्याची भाषा केली जाते. त्यांच्यावर कारवाई का होत नाही. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे. लोकशाही मध्ये ह्या गोष्टी योग्य नाहीत. 

युवा सेनेच्या कार्यक्रम करायचे, मात्र, जन आशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल केले जातात. राणे यांना अटक केली तरी, जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱयांनवर पोलिसांकडून गुन्हे दाखल झाले पाहिजे, अन्यथा संबंधित जिल्ह्यांतील पोलीस कार्यालयासमोर मी आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आंदोलन करू पोलिसांना मी सल्ला देत आहे धमकी नाही असे फडणवीस म्हणाले. आता याप्रकरणाला काय नवीन वळण लागते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil म्हणाले की, देशाच्या शिष्टाचारानुसार  केंद्रीय मंत्र्यांना राज्य सरकार अटक करू शकत नाही. राणे यांची बोलण्याची एक स्टाईल आहे. त्यानुसार ते बोलले, यामुळे लगेचच अटक करणे चुकीचे आहे. 

''हा सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. राणे असो किंवा रावसाहेब दानवे यांनी एक काम करण्याची कार्यपद्धती व स्टाईल आहे. त्यामुळे त्यांना लगेचच अटक  करता येत नाही. त्यांच्यावर एखादी केस दाखल करणे किंवा समज देणे स्वाभाविक आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्याला थेट अटक करणे चुकीचे आहे. देशाच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सात 'अ' व  मुख्यमंत्री हे सात 'ब' या स्थानी असतात, यामुळे त्यांना अटक करता येत नाही. यांना कोण सल्ले देतात माहीत नाहीत. यामुळे ते वारंवार तोंडावर पडत आहेत,'' असे पाटील म्हणाले. 
 

Related Stories

No stories found.