राणे कुटुंब बाळासाहेबांना विसरले नाही... पण उद्धव यांनाही सोडले नाही! - rane family offer tribute to balasaheb thaceray but criticize Udhhav in same tweets | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

राणे कुटुंब बाळासाहेबांना विसरले नाही... पण उद्धव यांनाही सोडले नाही!

गणेश कोरे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेससोबत सरकार स्थापन केल्याचा राणेंना राग!

पुणे :  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे माजी नेते, माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी अभिवादन केले आहे. अभिवादन करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. स्वतः राणे, त्यांचे पुत्र निलेश व नितेश या तिघांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी या निमित्ताने साधली. 

`साहेब, आपण असता तर असे घडू दिले नसते,` असे म्हटले आहे. तर राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी वडिल नारायण राणे यांचे बाळासाहेबांना पुष्पहार घालुन सत्कार करतानाचा तरुणपणातील छायाचित्र ‘साहेब' म्हणत ट्वीट केले आहे.

नारायण राणे आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात,‘‘ माननीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते.‘‘

 

महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते. (२/२) #BalasahebThackeray

 

शिवसेनेवर आणि विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात सातत्याने टीका करणारे आमदार नितेश राणे यांनी त्यांचे वडिल नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांचा पुष्पहार घालुन सत्कार करतानाचे तरुणपणातील छायाचित्र ट्वीट केले आहे. स्व. पंतप्रधान व काॅंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुष्पहार घालतानाचे छायाचित्र नितेश यांनी ट्विट करत उद्धव यांना सवाल विचारला आहे. ठाकरे यांच्या छाय़ाचित्राला राहुल गांधी हे पुष्पहार घालताना दिसतील  का, अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे यांनीही श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. `बाळासाहेब, आज तुम्ही नाही आहात. पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही... स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन,` अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख