मायावतींबाबत आक्षेपार्ह विधान..'राधे' मधील कलाकार अडचणीत..#ArrestRandeepHooda ट्रेंड  - randeep hooda stucks in trouble after passing dirty joke about mayawati | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

मायावतींबाबत आक्षेपार्ह विधान..'राधे' मधील कलाकार अडचणीत..#ArrestRandeepHooda ट्रेंड 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

रणदीप हुड्डा हा आक्षेपार्ह शब्द वापरुन मायावती यांची थट्टा करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुंबई : 'बजरंगी भाईजान' सलमान खान यांच्या 'राधे' चित्रपटात खलनायकांची भूमिका करणारा रणदीप हुड्डा त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडला आहे. बहुजन समाज पक्षाच्या  सर्वेसर्वा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबत रणदीप हुड्डा यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर  #ArrestRandeepHooda ट्रेंड सुरु आहे. randeep hooda stucks in trouble after passing dirty joke about mayawati

रणदीप हुड्डा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डाने मायावती यांच्याबाबत अश्लील विनोद सांगितला आहे. यात त्याने मायावती यांची थट्टा केली आहे.  रणदीप हुड्डा हा आक्षेपार्ह शब्द वापरुन मायावती यांची थट्टा करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रणदीप हुड्डा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.

रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण ठाकरे सरकार मागे पुढे पाहणार नाही..भाजपचा टोला

उत्तरप्रदेशात मायावती यांचे समर्थक त्यांना 'आयर्न लेडी' म्हणतात. उत्तरप्रदेशाता त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांचीही संख्या मोठी आहे. रणदीपच्या या विनोदामुळे मायावतींच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे कॉमेडियन अबीश मॅथ्यूने माफी मागितली होती. त्या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावती यांच्याबाबत अपमानास्पद गोष्टी लिहिल्या होत्या.

''रणदीप हुडा हा जोक नाही. आजपर्यंत कोणत्याही पुरुष नेत्यावर थट्टा होत नाही आणि तुम्ही एका दलित आणि मागासांच्या महिला नेत्याची अशी अश्लील थट्टा केली आहे. जे चुकीचे आहे. तर आणखी एका युझरने लिहिले आहे की, तुमच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत, मग तुम्ही आयर्न लेडी मायावती यांचीच थट्टा का केली?'' असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. 

रणदीप हुडा या व्हिडीओमध्ये सोशल मीडियाबद्दल बोलत आहे. यावेळी मी तुम्हा एक ‘डर्टी जोक’ सांगतो. तो म्हणतो की, दोन मुलांसह मायावती जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, ही जुळी मुले आहेत का?’ त्यावर मायावती म्हणतात नाही, एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा. यानंतर रणदीप हुडा जे काही म्हणाला त्याबाबत अनेकांची संताप व्यक्त केला आहे.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख