दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी आठवले उतरले मैदानात  

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करुन १२ वीची परीक्षा पुढे ढकलली आहे.
 Ramdas Athavale .jpg
Ramdas Athavale .jpg

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत चालली आहे. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करुन १२ वीची परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने ही निर्णय घेऊन राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

यंदा १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेणे योग्य होणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळून परीक्षा घेणे योग्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा उचित निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणेच राज्य सरकार ने निर्णय घेऊन परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी सूचना आठवले यांनी केली आहे. 

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेक राज्यांनी सीबीएसई परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती महाराष्ट्रासह काही राज्यांनी केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने सीबीएसईची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलाला मिळाला आहे. 

देशात दररोज पावणे दोन लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्याची वाढ प्रचंड वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसह दहावी व बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्याने केंद्र सरकारकडे सीबीएसई परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारने परीक्षा रद्द कराव्यात, करावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

असा लावणार दहावी सीबीएससीचा निकाल

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना निकालाची चिंता सतावणार आहे. कारण मंडळाने निकाल लावण्यासाठी एक वस्तुनिष्ठ निकष ठरविला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. याबाबत मंडळाकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल लावताना कोणत्या गोष्टींचा विचार होणार, हे गुलदस्त्यात आहे. 

सीबीएससी बारावी परीक्षेचा निर्णय एक जूननंतर

इयत्ता बारावी परीक्षेचा निर्णय 1 जूननंतर घेतला जाणार आहे. कोरोनाची त्यावेळची स्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना किमान 15 दिवस आधी कळविले जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com