रामदास आठवले आंबेडकरी कलावंतांना करणार प्रत्येकी 5 हजाराची मदत... - Ramdas Athavale will help Ambedkar artists | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

रामदास आठवले आंबेडकरी कलावंतांना करणार प्रत्येकी 5 हजाराची मदत...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

रामदास आठवले आपल्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्र दिन ( ता. 1) आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपल्या एक महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाउनच्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. 

राज्यात अजून 15 मे पर्यंत लॉकडाउन वाढणार आहे.  या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत. 

गत वर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीचे जाहीर  कार्यक्रम करण्यात आले नाही. यंदाही नेमका 14 एप्रिल आंबेडकर जयंतीपासून राज्यात लॉकडाउन लागला असल्याने आंबेडकरी कलावंतांना  कार्यक्रम मिळालेले नाहीत. 

दोन्ही वर्षी आंबेडकरी कलावंतांचा  रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आंबेडकरी गायक कलावंतांना येत्या ता. 1 मे रोजी प्रत्येकी 5 हजार रुपये आर्थिक मदत रामदास आठवले करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना महिन्याला 2 लाख रुपये वेतन मिळते. एका महिन्याचे वेतन 2 लाख रुपये त्यांनी आंबेडकरी कलावंतांना मदत केली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख