राज ठाकरेंचा लाडका श्वान 'जेम्स'चा मृत्यू, निरोप देताना झाले भावूक   - Raj Thackeray's pet dog 'James' passed away, he became emotional while saying goodbye  | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंचा लाडका श्वान 'जेम्स'चा मृत्यू, निरोप देताना झाले भावूक  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय तसेच पक्षातील नेते आणि समर्थक उपस्थित होते.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा फोटोंच्या माध्यमातून त्यांचे श्वानप्रेम सर्वांसमोर आले आहे.  त्यांचा लाडका श्वान 'जेम्स' याचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप दिला. यावेळी ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले. राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय तसेच पक्षातील नेते आणि समर्थक उपस्थित होते. (Raj Thackeray's pet dog 'James' passed away, he became emotional while saying goodbye)

हे ही वाचा : अनिल देशमुखांना अटक होईल; सर्व पुरावे EDच्या हाती

ठाकरे यांचा श्वान जेम्स चे सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. जेम्स गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंच्या घरातील लाडका सदस्य होता. जेम्स साडेबारा वर्षांचा होता. वयोमानानुसार त्याचे निधन झाले असून परळमधील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. यावेळी जेम्सचे अखेरचे दर्शन घेताना राज ठाकरे भावूक झाले होते.

हे ही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा

राज ठाकरे आणि जेम्सचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंमधून राज ठाकरेंना जेम्सचा किती लळा होता हे दिसते. त्यामुळे आपल्या लाडक्या जेम्सच्या जाण्याने राज ठाकरे भावूक झाले होते. ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉण्ड आणि शॉन यांचे काही वर्षापुर्वी निधन झाले आहे. त्यानंतर आता जेम्सचे निधन झाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख