मला हे वाचून धक्काच बसला; राज ठाकरेंचे मोदींना पत्र 

संपूर्ण देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकीच्या राज्यातलीही दृश्ये पाहिली.
 Raj Thackeray, Narendra Modi .jpg
Raj Thackeray, Narendra Modi .jpg

मुंबई : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 14 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 104 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले, नाहीत तेवढे रुग्ण भारतात मागील 24 तासांत आढळले आहेत. यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता, व्यक्त करत रेमडेसिव्हिरच्या केंद्राच्या धोरणावर ताशेरे अोढले आहेत.  

मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे म्हणाले की, ''संपूर्ण देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. प्रेतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकीच्या राज्यातलीही दृश्ये पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे. राजकारणाची मुळीच नाही. आत्ता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता'', असल्याचे ठाकरे म्हणाले. 

''आरोग्यसेवेची यंत्रणा संपूर्णपणे कोसळली आहे. कोरोनाबाबतच्या चाचण्या पुरेशा गतीने होत नाहीत, रुग्णालयात पुरेशा खाटा नाहीत, उपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हिर आणि इतर साधने उपलब्ध नाहीत, अत्यंत गरजेचा असा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत नाही. लसीकरण आपण खुले केले तर आहे परंतु त्यासाठी योग्य संख्येने पुरवठा होईल की नाही ह्याची खात्री नाही. आपण ह्या साथरोगाबाबतीतले व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभे करण्याची गरज, असल्याचे म्हणत ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

''देशाच्या इतिहासात इतके मोठे आरोग्य संकट गेल्या १०० वर्षात आले नसावे, हे आव्हान म्हणूनच फार मोठे आहे. आशातच बातमी वाचली की रेमडेसिव्हिर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्सनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वतः करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला''. असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. ''आपण नुकतेच देशाला उद्देशून केलेले भाषण मी काळजीपूर्वक ऐकले. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि ह्या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय-काय पावले उचलली पाहिजेत ह्याचे मार्गदर्शनही केले आहे''. 

''त्यानंतर मग रेमडेसिव्हिर सारख्या औषधांची खरेदी वितरण केंद्राने स्वतः कडे ठेवण्याचे प्रयोजन काय'', असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. वास्वविक राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणे आणि त्यांना योग्य उपचार देणे ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असे असतांना केंद्राने रेमडेसिव्हिरचे व्यवस्थापन स्वतःकडे ठेवण्याचे कारण काय''? 

''कोरोनाविरुद्धच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे. राज्य सरकारांची यंत्रणा, अशा परिस्थितीत केंद्राने रेमडेसिव्हिरची वितरणाची यंत्रणा स्वताःकडे ठेवू नये''. अशी मागणी राज यांनी केली आहे. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्या कडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असे दिसते'', असेही ठाकरे म्हणाले आहेत. 

''ह्याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिव्हिर कसे घ्यायचे, कुठे, कसे वितरित करायचे ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम केंद्राचे नाही. कोरोनाविरुद्धची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयाने, सहकार्याने काम करण्याची गरज आहे.

राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याल्या आधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करुन घ्यायला हवा. आपल्या संविधानाने दिलेल्या संघराज्य पद्धतीचा आत्माही तोच आहे'', असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. ह्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल आणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल. अशी अशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  
 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com