सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटण्याची हिंमत कशी होते ?

ज्यादिवशी हल्लेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटणार तेव्हा त्यांना मनसे चोपणार
Sarkarnama (41).jpg
Sarkarnama (41).jpg

मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे  Kalpita Pimple काल संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लेखोरांना इशारा दिला. 

राज ठाकरे म्हणाले, ''अनाधिकृत फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. एका महिला अधिकाऱ्याची बोटं छाटली जातात, याचा नुसता निषेध करुन चालणार नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. सरकारी अधिकाऱ्याची बोटं झाटण्याची हिंमत कशी होते ? ज्यादिवशी हल्लेखोर पोलिसांच्या तावडीतून सुटणार तेव्हा त्यांना मनसे चोपणार,''
 
'मंदिरे सुरू करा,' अशी मागणी लावून धरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी ठाकरे सरकारच्या Uddhav Thackeray विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ''मंदिर उघडली पाहिजे,'' यासाठी मनसेकडून लवकरच घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

''सरकारला जनआशीर्वाद यात्रा, मेळावे चालतात, पण सण आला की लॉकडाऊन करतात, 'लॉकडाउन आवडे सरकारला' अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. सगळ्यांना नियम सारखे लावा, एकाला एक दुसऱ्याला दुसरा नियम असं चालणार नाही.  शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केलं असते. 'ते' घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात. तर आम्ही काय करणार,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

''दहीहंडी साजरी करण्याचे मनसेच्या कार्यक्रर्त्यांना मीच सांगितलं. दहीहंडीवर बंदी घालणे, मंदिरं बंद ठेवणं हे सूडबुद्धीने सुरू आहे. नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी सुरू, मेळावे सुरू, भास्कर जाधव च्या मुलांसाठी मंदिर उघडी आहेत, क्रिकेट, फुटबॉल सगळं सुरू आहे, तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही,'' असा संतप्त सवाल ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com