राज ठाकरेंनी स्वीकारले शिवसेनेचे आव्हान; नाणार प्रकल्पग्रस्तांची घेतली भेट 

कोरोनाउत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची, असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा प्रकल्प हातातून गमावणेपरवडण्यासारखे नाही
 Raj Thackeray .jpg
Raj Thackeray .jpg

मुंबई : कोरोनाउत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची, असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरी सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.

त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्र लिहिले होते. त्यानंतर त्यांनी आज सोमवार (ता. ८ मार्च ) सकाळी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. राज यांनी त्यांच्याशी या प्रकल्पावरुन चर्चा केली. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. नाणारमध्ये २२१ भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे का? असा सवाल करत हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी नाणार वासियांसमोर भूमिका मांडावी, असे आव्हान विनायक राऊत यांनी ठाकरेंना दिले होते. राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. आता त्यांचे मतपरिवर्तन कशासाठी झाले, हे माहित नाही. २२१ गुजराती लोकांनी जमिती खरेदी केल्या त्यांच्या भल्यासाठी ही भूमिका घेतली आहे का ? असा सवालही विनायक राऊत यांनी उपस्थित केला होता. 

अशोक वालम काय म्हणाले होते?  

रत्नागिरी राजापूर रिफायनरी वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रावरुन नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

नाणार परिसरातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी समर्थन आहे की ९५० कोटीची गुंतवणूक करणाऱ्या बी. के. सी च्या गुजराती-मारवाडी लोकांसाठी आहे हे समर्थन? असा सवाल वालम यांनी केला आहे. ते म्हणाले की, नाणार रिफायनरीला स्थानिकांचा कालही विरोध होता, आजही आहे आणि भविष्यातही तो विरोध खूप मोठ्या प्रमाणात वाढताना तुम्हा सर्वांना दिसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे नानार प्रकल्पावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com