मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण - Raj Thackeray son Amit infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिंरजीव मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा कोराना चाचणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांना सर्दी आणि ताप जाणवत होता.  काल त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोना झाला  होता. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. यापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाची लागण झाली आहे.

अमित ठाकरे  गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेच्या कामातही सहभागी होत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियातून कोरोनाबाबत जनतेला आवाहन केलं होतं.

''माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर ‘कृपया’मृत्यूच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडिओ कृपा करून शेअर करू नका, तुम्हाला आले तर ते एक तर तुमच्याकडेच ठेवा अन्यथा डिलीट करा, पण व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवू नका,'' असे अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख